म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीचे सत्र सुरू असून, शनिवारी दुपारी दक्षिण मुंबईत भेंडी बाजार येथे एका चार मजली इमारतीमध्ये वीजेच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत, ५० ते ६० रहिवाशांना वेळीच इमारतीमधून सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

मुंबईत २२ जानेवारी रोजी ताडदेव येथील कमला इमारतीत आग लागल्याची, तर २६ जानेवारी रोजी साकीनाका येथील जैन सोसायटीत गॅस गळती होऊन आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी भेंडी बाजार येथील ख्वाजा महल या तळमजला अधिक चार मजली इमारतीमधील वीजेच्या मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

निवृत्त शिपायाने उघडला दवाखाना,घेतले 5 बळी

Thane news: आरोग्य केंद्रातील निवृत्त शिपायाने उघडला दवाखाना; चुकीच्या उपचारांमुळे पाच गावकऱ्यांचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साह्याने आगीवर एका तासात नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. इमारतीमधील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ इमारतीबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली.

मुंबई APMC मध्ये धक्कादायक प्रकार, भाजीपाल्याच्या वाहनात लपवून आणल्या होत्या….

३ अग्निशमन जवान जखमी

माटुंगा येथील साई सिद्धी इमारतीत मॉकड्रील सुरू असताना अपघात होऊन अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहे. या तिघांनाही सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीसह इतर आपत्तीच्या काळात स्वत:चा बचाव कसा करावा, तसेच मदतकार्य कसे करावे याबाबत अग्निशमन दलामार्फत नागरिकांना मार्गदर्शन केले जाते. शनिवारी माटुंगा पूर्व येथील डॉ. भाऊ दाजी लाड मार्गावरील साई सिद्धी इमारतीत मॉकड्रील सुरू होते. त्यावेळी अचानक पाण्याचा दाब वाढला आणि दोन गाड्यांपैकी एक गाडी पुढे सरकली. त्यात तीन जवान जखमी झाले. चालक सदाशिव धोंडिबा कर्वे हे गंभीर जखमी झाले असून, चंचल भीमराव पगारे आणि निवृत्ती सखाराम इंगवले हे जखमी झाले. या तिघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ऐरोलीतील फेरीवाल्यांवर कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here