अमृता फडणवीस या सातत्याने ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करत असतात. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले वक्तव्य आणि ताडदेवमध्ये इमारतीला लागलेल्या आगीच्या मुद्द्यावरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले होते.

अमृता फडणवीस या सातत्याने ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करत असतात.
हायलाइट्स:
- अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांना डिवचले आहे
- आता महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांकडून अमृता फडणवीस यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार,
अमृता फडणवीस या सातत्याने ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करत असतात. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले वक्तव्य आणि ताडदेवमध्ये इमारतीला लागलेल्या आगीच्या मुद्द्यावरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले होते.
नाना पटोले प्रकरणात आता अमृता फडणवीसांचीही एंट्री
राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांची अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह टीका
काही दिवसांपूर्वी भाजपच्या आयटी सेलच्या नेत्याने रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या ट्विटमुळे वादंग निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजपवर टीका करताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना विनाकारण वादात खेचले होते. भाजपच्या नेत्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी यांची उपमा दिली असेल तर त्या खूपच नशीबवान आहेत. राबडीदेवी या चूल, मूल आणि घर सांभाळणारी स्त्री होती. बरं झालं, भाजपवाल्यांनी रश्मी ठाकरे यांना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाहीतर लोकांसमोर रश्मी ठाकरे यांची प्रतिमा ‘डान्सिंग डॉल’सारखी गेली असती. राबडीदेवींची उपमा दिली जाते याचा अर्थ रश्मी ठाकरे यांची प्रतिमा तितकीही वाईट नाही. तसेच भाजपवाल्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय गुण उधळले, हेदेखील ट्विट करुन सांगावे, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले होते. विद्या चव्हाण यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network