कांदे, बटाटे, तूरडाळ, मुगडाळ या सगळ्यातून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करु शकत नाही. पण कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीत.

 

Modi inflation

कांदे, बटाटे, तूरडाळ, मुगडाळ या सगळ्यातून आपण बाहेर आले पाहिजे.

हायलाइट्स:

  • कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही
  • या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करु शकतात
प्रदिप भणगे, कल्याण: पाकव्याप्त काश्मीर हा भारतात फक्त नरेंद्र मोदीच आणू शकतात. त्यामुळे महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात अर्थ नाही. नरेंद्र मोदी हे कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झालेले नाहीत, असे वक्तव्य भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केले. कांदे, बटाटे, तूरडाळ, मुगडाळ या सगळ्यातून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करु शकत नाही. पण कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नसल्याचेही कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता यावर विरोधक काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. (BJP MP Kapil Patil statement on POK)

कपिल पाटील हे शनिवारी कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य केले. कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही, असे कपिल पाटील यांनी म्हटले. मात्र, या कार्यक्रमानंतर कपिल पाटील यांनी लगेच आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी अशा प्रकारचा कायदा केला होता. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. त्याचा पुन्हा भारतामध्ये समावेश होणे, ही देशातील प्रत्येक नागरिकाची अशी मनोमन इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण आशेवर आहोत, असा माझ्या विधानाचा अर्थ असल्याचे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
कपिल पाटील आधी म्हणाले पंतप्रधान मोदी २०२४ पर्यंत POK भारतात आणतील, कार्यक्रम संपताच घेतला यू-टर्न
कपिल पाटील आणखी काय म्हणाले?

काश्मीरमधील ३७० आणि ३५ ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत त्यांनी कायदा पारित करुन घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय. तर आता आपण वाट बघूया कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करु शकतात, असे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : pm narendra modi become a pm to bring pok in india not to reduce onion potato inflation bjp mp kapil patil slams opposition over inflation
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here