वन विभागाच्या टीमने त्वरीत घटनास्थळी धाव घेवून सदर प्राण्याची पाहणी केली असता त्यांना ती जखमी झाल्याच आढळले. त्यामुळे तिच्यावर योग्य उपचार करता यावे या करीता त्यांनी तीला चामटोली येथील ‘पाणवठा’ या अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमात दाखल केले.

वांगणी येथील ज्या घरात ती शिरली होती त्या घरातील लादीवर पाय घसल्याने दुखापत झाली होती.
हायलाइट्स:
- वाट चुकलेल्या रोही या सांबर प्रजातीच्या मादीला जीवदान
- वनविभागाने पाणवठा अनाथाश्रमाच्या मदतीने उपचार केले
त्यानंतर पशुवैदकीय अधिकारी डॉ. प्रिती म्हात्रे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. वांगणी येथील ज्या घरात ती शिरली होती त्या घरातील लादीवर पाय घसल्याने दुखापत झाल्याचे लक्षात आल्याने पाणवठा अनाथाश्रमाचे संचालक गणराज जैन, डॉ. अर्चना जैन यांनी तिला शेणाची जमीन असलेल्या स्वतःच्या घरात ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसाच्या अथक प्रयत्नांनतर बरे झालेल्या या गोंडस प्राण्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागामार्फत तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अंबरनाथमध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या कुत्र्याचं तोंड बरणीत अडकल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर पोलीस कर्मचारी यांनी बरणीत अडकलेले तोंड बाहेर काढून कुत्र्याची सुटका केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : sambar deer gets injured after dogs chasing in vangani maharashtra
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network