मुंबई : येत्या मंगळवारी केंद्रीय संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन चौथ्यांदा बजेट सादर करणार आहेत.

  1. यंदा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी आहे?यंदाचा अर्थसंकल्प (बजेट) येत्या मंगळवारी, १ फेब्रुवारी रोजी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील.
  2. ‘बजेट’चे थेट प्रक्षेपण पाहता येईल का ?होय, केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण लोकसभा वाहिनीवर केले जाणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता लोकसभा वाहिनीवर थेट प्रक्षेपण सुरु होईल. त्याशिवाय अर्थ मंत्रालयाच्या सोशल मीडिया हॅन्डलवर देखील याची अद्ययावत माहिती दिली जाईल.
  3. आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल कधी सादर होणार ?आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल २०२१-२२ (Economic Survey) सोमवार ३१ जानेवारी २०२२ रोजी संसदेत सादर केला जाईल.
  4. आर्थिक सर्वेक्षण पाहणीमध्ये कशाचा समावेश असेल ?आर्थिक सर्वेक्षण पाहणी हा अर्थ खात्याचा महत्वाचा दस्तावेज आहे. सरत्या आर्थिक वर्षात सरकारने कोणती विकास कामे केली, किती खर्च केला, सरकारने निधी कसा जमवला याचा लेखाजोखा मांडला जातो.
  5. आर्थिक सर्वेक्षण पाहणी कोण तयार करते ?आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल हा केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनात तयार केला जातो. आर्थिक वर्षातील देशातील प्रगती याचा आढावा यात घेतलेला असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here