मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाची उत्सुकता वाढली आहे. येत्या मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. मागील दोन वर्ष सामान्य करदात्यांना बजेटमधून फारसे काही मिळाले नाही. त्यामुळे यंदा मोदी सरकारकडून सामान्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

  1. ‘बजेट’ शब्द कुठून आला ?– बजेट हा मूळचा फ्रेंच शब्द bougette पासून तयार झाला आहे. bougette शब्दाचा अर्थ हा लहान आकाराची चामड्याची बॅग असा होतो. अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचा दस्त लेदर बॅगमधून संसदेत आणण्याची प्रथा होती. जी काही वर्षांपूर्वी बदलण्यात आली.
  2. भारतात पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला?– ब्रिटिश काळात सन १८६० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने देशात पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी मांडला होता.
  3. स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला?– स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. शनुखम चेट्टी यांनी सादर केला होता.
  4. अर्थसंकल्पाची हिंदी भाषेत छपाई कधीपासून सुरु झाली?– सन १९५५ पर्यंत अर्थसंकल्पाची केवळ इंग्रजी भाषेत छपाई होत असे, मात्र १९५५-५६ या वर्षापासून इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेमध्ये बजेटची छपाई सुरु झाली.
  5. बजेटमधील आतापर्यंत सर्वात मोठं भाषण कोणत्या वर्षी झाले?– दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटचे सर्वात मोठं भाषण केले. जेटली २०१४ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना संसदेत तब्बल अडीच तास बोलले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here