भोसलेवाडी येथील खंडेराव शिंदे सायंकाळी नियमित फिरायला जातात. आज रविवारी सायंकाळी घरातून बाहेर पडल्यावर ते भोसलेवाडी चौकात समता हायस्कूलजवळ आले. यावेळी चौकात लावलेला ट्रक अरविंद पोवार हा चालक मागे घेत असताना ट्रकचा धक्का शिंदे यांना बसला आणि ते रस्त्यावर पडले. यावेळी अंगावर ट्रकचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर ट्रकचालक पोवार पळून गेला.
दरम्यान, या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राजेश गवळी गुन्ह्याचा तपास करत आहेत.