रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेने चालवण्यास सुरुवात केली आणि मध्येच जो दिसेल त्याला तुडवत निघून गेला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लतुश रोड येथील २६ वर्षीय शुभम सोनकर, २५ वर्षीय ट्विंकल सोनकर आणि बेकनगंज येथील २४ वर्षीय अर्सलान यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.
आरएम डीव्ही सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ई-बस क्रमांक UP 78 GT 3970 बसला झाला. खाजगी एजन्सी पीएमआय ई-बसच्या संचालन आणि देखभालीसाठी जबाबदार आहे. त्याच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल. दरम्यान, पोलीस परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत असून, त्यातून हा अपघात कसा घडला हे स्पष्ट होईल.