औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलीस दलातील गेल्या सहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा रविवारी संध्याकाळी पोलीस मुख्यालयातील देवगिरी मैदानाजवळ असलेल्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मात्र हे अपघात की आत्महत्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. संजय फकीरराव गाडे (५०, रा. पडेगाव, औरंगाबाद) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय गाडे हे शहर पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होते. त्यामुळे ते नित्या प्रमाणे २४ जानेवारी रोजी सकाळी घरी कर्तव्यावर जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. त्यानंतर दुपारी त्याच दिवशी गाडे यांनी दुपारी १ वाजता मुख्यालयात मुलाची भेट घेतली व त्यांचं एटीएमकार्ड मुलाला दिलं होतं. मात्र संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गाडे घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने मुलाला कळविले. त्यांचा शोध घेतला असता त्यांची दुचाकी ही मुख्यालयात आढळून आली. त्यांचा मोबाईल बंद होता. सर्वत्र शोध घेतल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता.

Accident News: लग्नसमारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, ४ जण ठार; २२ जखमी
रविवारी सायंकाळी मैदानावर काही मुले खेळत असताना त्यांना विहिरीच्या बाजूने दुर्गंधी येत असल्याचे त्यांनी प्रशिक्षक तडवी यांना सांगितले. तडवी यांनी विहिरीजवळ डोकावून पाहिले असता विहिरीत मृतदेह दिसला. त्यानंतर माहिती मुख्यालयात कळाली. तर गाडे यांचा मुलगा किशोर यांनाही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येऊन मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे सांगितले.

Prashant Bamb: भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला २५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here