वर्धा : वर्धेच्या सेलसुरा येथे झालेल्या भीषण अपघातात ७ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेननंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होत. घटनेच्या सात दिवसानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात गाडी अतिशय वेगाने असून रस्त्यावरून जातं असलेल्या एका फॉरटूनर कारसोबत रेसिंग लावल्याची चर्चा आहे. हा व्हिडीओ अपघाताच्या काही वेळ पूर्वीचा असल्याच सांगण्यात येतं आहे.

सावंगी(मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सात विद्यार्थ्यांचा यात मृत्यू झाला होता. तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले, नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती हे नितेश सिंग यांच्या वाहनाने पवन शक्तीचा वाढदिवस साजरा करायला निघाले होते.

Accident News: लग्नसमारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, ४ जण ठार; २२ जखमी
हे सर्व सोमवारी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नागपूर तुळजापूर महामार्गवरील इसापुर जवळील माँ की रसोई या हॉटेलमध्ये पोहचले होते. यानंतर रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी ते जेवणासह वाढदिवस साजरा करून निघून गेले. येथूनच सावंगीला परत जात असताना सेलसुराजवळ हा भीषण अपघात झाला आणि यात सातही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेच्या सातव्या दिवशी सोशल मीडिवायर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अपघाताच्या काही वेळ पूर्वीचा असून यात अपघातग्रस्त झालेला एक्सयुवी वाहन हे भरधाव वेगात चालवत असल्याच दिसते. हा व्हिडीओ अपघाताच्या पहिले यातीलच मृतक शुभम जयस्वाल याच्या इंस्टाग्रामच्या स्टेटसवर असल्याची माहिती आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ नुसार हा व्हिडीओ वाहन चालवीणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूला बसून रेकॉर्ड करण्यात आला आहे. सोबतच हे रस्त्यावर जाणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉरटूनर कारशी रेसिंग लावत असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर वाहनाचा वेग जास्त असल्याचा अंदाज बांधला जातं होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हे वाहन निष्काळजीपणाने चालवत असल्याचं उघड झालं आहे.

खळबळजनक! ६ दिवसांपासून बेपत्ता होते पोलीस कर्मचारी, आज समोर आली धक्कादायक बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here