पालघर: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकच्या पाठिमागच्या बाजूला आग लागली होती. मात्र, चालकाला त्याबाबत काहीच माहीत नव्हते. जवळपास ४ किलोमीटरपर्यंत हा पेटता ट्रक धावत होता. चालकाला ट्रक पेटल्याचे समजले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. संपूर्ण ट्रक पेटला होता. या धावत्या ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पालघरमधील अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धावणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली. किमान चार किलोमीटरपर्यंत हा पेटता ट्रक रस्त्यावरून धावत होता. या ट्रकमधून चाऱ्याची वाहतूक केली जात होती. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पालघरच्या शिरसाट फाट्याजवळ घडली. पेटत्या ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने हे भयंकर दृश्य मोबाइल कॅमेऱ्यात टिपले आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल केला.

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; ‘मटा ऑनलाइन’च्या ‘त्या’ व्हिडिओची दखल, चित्रा वाघ यांचा सरकारला ‘हा’ तिखट सवाल
Ratnagiri airport: चिपीनंतर आता रत्नागिरीत विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली, केंद्र सरकारकडे…

मिळालेल्या माहितीनुसार, पेटता ट्रक रस्त्यावरून धावत होता. जवळपास ४ किलोमीटरपर्यंत हा ट्रक धावत राहिला. याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनातील व्यक्तीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. पालघरच्या वसई-विरार महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकचे नुकसान झालेले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

उल्हास नदीने घेतला मोकळा श्वास; संवर्धन मोहिमेला ‘असं’ आलं यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here