उस्मानाबाद : तुळजापूर शहरातील राज पॅलेसच्या पाठीमागील इमारतीतील जिन्यावरुन खाली उतरताना तोल गेल्याने पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे. मयत अनिल गंगाधर किरवाडे वय ३४ नेमणूक पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथे कर्तव्यावर होते. त्यांना मदत करायला गेलेले पोलीस कर्मचारी योगेश हणमंत सुर्यवंशी वय ३८ हे गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News: लग्नसमारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, ४ जण ठार; २२ जखमी
जिन्याला लोखंडी ग्रिल नसल्यामुळे तोल गेला

तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरताना तोल गेला आणि तळ मजल्यावरील पायऱ्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्यामुळे अनिल किरवडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांना मदत करायला गेलेले योगेश सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाल्यामुळे तत्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

वर्ध्यातील ७ भावी डॉक्टरांच्या अपघातापूर्वीचा VIDEO आला समोर, दृश्य पाहून तुम्हीही हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here