मुंबई: राज्यात सध्या वाइन विक्रीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठी दालने आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यावर अपेक्षित बऱ्यावाईट प्रतिक्रिया येत आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Exclusive: Bigg Boss 15 मध्ये कोणी अमिताभ बच्चन नाही, त्यांच्याहून समाजात मलाच मान जास्त- अभिजीत बिचुकले
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिचुकले यांनी बिग बॉस आणि राज्यातील वाइन विक्री प्रकरणावर भाष्य केलं. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आवडला नसल्याचं बिचुकले म्हणाले. ‘मी निर्व्यसनी आहे. त्यामुळं किराना दुकानात वाइन विक्री यावर तोडगा काढण्यासाठी मातोश्री किंवा वर्षावर जाऊन उद्धवदादांशी (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) बोलणार असल्याचंही बिचुकलेंनी म्हटलं.

कोण आहे अभिजित बिचुकले?
सलमानबद्दल वक्तव्य
बिचुकलेंनी सलमान खान बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. असले १०० सलमान मी माझ्या इथं गल्ली झाडायला उभे करेन. दुसरं कुणी मोठं झालेलं त्याला पाहावत नाही. असं बिचुकलेंनी म्हटलं आहे.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?
अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्याला एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्यही त्यांनी केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here