नाशिक: शहरातील जेलरोड भागात आज सकाळी दिसलेल्या बिबट्याने एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला आहे. त्यात ही व्यक्ती जखमी झाली आहे. वनविभागाने लगेचच अतिरिक्त पथकाला पाचारण केलं आहे. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जेलरोड भागातील उद्यानालगतच्या परिसरात सकाळी हा बिबट्या दिसला होता. ही माहिती मिळताच वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत बिबट्या दिसेनासा झाला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध सुरू केला. शोध सुरू असतानाच बिबट्यानं एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला. यात ही व्यक्ती जखमी झाली आहे.

वाचा: किराणा दुकानांतून वाईन विक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले…

खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून अतिरिक्त पथके बोलावली आहेत. नागरिकांना पांगावले आहे. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्यूलाईज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाचा: ‘या’ प्रकरणातील पुष्पाभाऊ कोण? मिरजेत अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

नाशिक

नाशिकमध्ये बिबट्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here