२. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता.
३. १९५५ पर्यंत, अर्थसंकल्प फक्त इंग्रजीत सादर केला जात होता, परंतु १९५५-५६ पासून, अर्थसंकल्प इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रकाशित केला जातो.
४. माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पी चिदंबरम यांनी आठ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. तर माजी अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण, सीडी देशमुख आणि प्रणव मुखर्जी यांनी प्रत्येकी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला.
५. १९९८ पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी सादर व्हायचा. ब्रिटिशकालीन ही प्रथा संपवत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी सकाळी १९९८-१९९९ चा अर्थसंकल्प सादर केला.
६. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७०-७१ मध्ये काही काळ अर्थ मंत्रालयाचा कारभारही सांभाळला होता आणि अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
७. २०१६ पर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. पण ही परंपरा २०१७ पासून बदलली गेली, जेव्हा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
८. 8. यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. पण २०१७ मध्ये त्याचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. यामुळे ९२ वर्षांची परंपरा संपुष्टात आली.
९. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी ओमिक्रॉन प्रकार पाहता, ७० वर्षांच्या हलवा समारंभाच्या परंपरेऐवजी मिठाईचे वाटप केले. पूर्वी बजेटच्या छपाईची सुरुवात हलवा समारंभाने होत असे.
१०. २०१९ मध्ये, पारंपारिक ब्रीफकेसऐवजी, सीतारामन यांनी लेजरमध्ये बजेट दस्तऐवज आणले (राष्ट्रीय चिन्हासह लाल रंगाचे पॅकेट).
११. देशातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याचा विक्रम सीतारामन यांच्या नावावर आहे. त्यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी दोन तास ४१ मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले होते.