न्यूयॉर्क, अमेरिका:

तब्बल ३६ लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाल्याचा संदेश मिळाला… आणि अमेरिकेच्या ऑकलंड विद्यापीठात शिकणाऱ्या तब्बल ५५०० विद्यार्थ्यांच्या आनंदाचा पारावार उरला नाही. खुद्द विद्यापीठाकडून हा संदेश विद्यार्थ्यांना धाडण्यात आला होता. परंतु, विद्यार्थ्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.

विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर थोड्याच वेळात विद्यापीठाच्या लक्षात आपली चूक आली. त्यानंतर विद्यापिठानं लगेचच दुसरा ई-मेल धाडत आपली चूक स्वीकार केली… आणि ३६ लाखांच्या स्कॉलरशिपचा संदेश चुकीनं धाडला गेल्याचं कबूल केलं.

विद्यापीठात शिकत असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थी कार्नेल यानं आपला हा अनुभव व्यक्त केला. स्कॉलरशिपच्या ई-मेलमध्ये विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं होतं. तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला ही स्कॉलरशिप देण्यात येत असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये करण्यात आला होता.

खराखुरा ‘रिची-रिच’ : नवव्या वर्षी नावावर महाल आणि खेळण्यासाठी ‘सुपरकार’!
Magnet Man: कोणत्याही आधाराशिवाय शरीरावर तोलून धरले ८५ चमचे! अनोखा रेकॉर्ड कायम
४ जानेवारी रोजी हा ई-मेल पाठवण्यात आला होता. पुढील चार वर्षांच्या अभ्यासादरम्यान एकूण ३६ लाख रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिले जातील, असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं.

अर्थातच हा ईमेल वाचून कॉर्नेलसह अनेक विद्यार्थ्यांना आणि त्याच्या कुटुंबाला आनंद झाला. कॉर्नेलला मोठं होऊन वकील व्हायची इच्छा आहे. परंतु त्याचा आनंद केवळ दोन तासच टिकला. ऑकलंड विद्यापीठ प्रशासनाकडून आणखी एक ई-मेल धाडण्यात आला यात चुकून हा ई-मेल धाडला गेल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं.

‘तुम्हाला प्लॅटिनम प्रेसिडेन्सियल स्कॉलर अवॉर्ड’चा ई-मेल चुकून धाडला गेला असून तुम्हाला ही स्कॉलरशीप मिळू शकणार नाही, असं विद्यापीठानं या नव्या ई-मेलमध्ये म्हटलं होतं. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षणिक आनंदावर विरजन पडलं होतं.

US Afghanistan: ​अमेरिकेचा माजी नौसेना अधिकारी तालिबान्यांच्या ताब्यातरशिया – युक्रेन तणाव : चीनचा डाव भारताच्या चिंतेत भर घालणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here