मुंबई: पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्यातच जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर…? अशीच एक प्रेमकथा छोट्या पडद्यावर येतेय. प्रेमकथा म्हटल्यावर साहजिक एका अभिनेत्याचं नाव आपसूक तोंडावर येतं; तो म्हणजे सर्वांचा लाडका स्वप्नील जोशी. स्वप्नील लवकरच पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘माझी तुझी रेशीम गाठ’ मालिकेतील यशवर्धनला झाला अपघात, आता तरी होणार का नेहाला प्रेमाची जाणीव
तू तेव्हा तशी‘ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत त्याच्याबरोबर शिल्पा तुळसकर दिसणार आहे. स्वप्निल सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर शिल्पा तुळसकर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिज्ञा भावेचीदेखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या नवीन व्यक्तिरेखेबद्दल स्वप्नील म्हणाला, ‘चाळीशी पार केलेल्या सौरभ-अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी म्हणजेच ‘तू तेव्हा तशी’. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी ही मालिका आहे.

मी निर्व्यसनी… किराना दुकानात वाईन विक्रीसंदर्भात उद्धवदादांना भेटणार: बिचुकले
यंदाच्या वर्षी मी मालिका करणार असं ठरवलं होतं. मालिकांनी किंबहुना टीव्हीच्या प्रेक्षकांनी मला आजवर भरभरून प्रेम दिलं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा येताना मी उत्सुक आहे.’ बऱ्याच वर्षांनी स्वप्नील मालिकेत येत असल्यामुळे या मालिकेची प्रेक्षक वाट बघत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here