ओटावा, कॅनडा :

उत्तर अमेरिकन देश कॅनडामध्ये करोना लस अनिवार्य करण्याच्या सरकारच्या घोषणेनंतर मोठा वाद निर्माण झालाय. देशभर आंदोलन सुरू असताना पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत घर सोडलंय. पंतप्रधान ट्रुडो एका सुरक्षित पण गुप्त जागी असल्याचं सांगण्यात येतंय.

ट्रुडो सरकारनं अमेरिकेची सीमा ओलांडणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्ससाठी लशीकरणाची सक्ती जाहीर केलीय. त्यामुळे ज्या चालकांनी लस घेतलेली नव्हती त्या चालकांना अमेरिकेहून परतल्यानंतर कॅनडामध्ये क्वॉरंटाईन व्हावं लागलं. त्यामुळे संतापलेल्या ट्रक चालकांनी या निर्णयाला जोरदार विरोध केलाय.

जवळपास ५० हजार ट्रक चालकांचं हे आंदोलन गेल्या सलग दोन दिवसांपासून सुरू आहे. आंदोलकांकडून कॅनडाच्या संसदेलाही घेरण्यात आलंय. याच दरम्यान आंदोलनकांनी कॅनडाच्या संसदेजवळ हुकूमशहा हिटलरच्या नाझी स्वास्तिकचं चिन्हं असणारा झेंडा (हाकेनक्रेउज) फडकावत सरकारच्या कोविड नियमांची तुलना ‘हुकूमशाही’शी केलीय तसंच पंतप्रधान ट्रुडोंवर तिखट टिका केलीय.

Dhandhuka Murder: पाक मौलाना साद रिजवीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि गुजरात हत्याकांडाचा संबंध समोर
US Afghanistan: ​अमेरिकेचा माजी नौसेना अधिकारी तालिबान्यांच्या ताब्यात
आंदोलक रस्त्यावर

जस्टिन ट्रुडो यांनी ट्रक चालकांविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी केलीय, ज्यामुळे ट्रक चालक अतिशय नाराज आहेत. आपल्या २० हजार ट्रकांसहीत ते राजधानीत दाखल झालेत. आंदोलनकर्त्यांनी आपल्या आंदोलनाला ‘फ्रीडम कॉन्व्हॉय‘ असं नाव दिलंय.

जवळपास आठवडाभर प्रवास करून हे हजारो ट्रक राजधानी ओटावात दाखल झालेत. हजारो आंदोलक आपल्या वाहनांसहीत रस्त्यांवर उतरलेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओटावा शहरात कॅनडा संसदेकडे जाणारा संपूर्ण रस्ता आंदोलकांनी रोखून धरलाय.

असं असलं तरी, आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावर एक वेगळी रांग बनवण्यात आलीय.

भारताला उपदेशाचे डोस

उल्लेखनीय म्हणजे, काही महिन्यांपूर्वी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनात आगंतुकपणे उडी घेणाऱ्या आणि भारत सरकारला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्याविरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रश्नापासून पळ काढलाय.

५५०० विद्यार्थ्यांना मिळाला ३६ लाख रुपयांच्या स्कॉलरशिपचा ई-मेल पण…
रशिया – युक्रेन तणाव : चीनचा डाव भारताच्या चिंतेत भर घालणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here