मुंबई :’तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं‘ या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते सी. एल. कुलकर्णी साकारत असलेली तात्या आजोबा ही भूमिका सर्वांना जवळची वाटत आहे.
सामाजिक दायित्वाची जाण असणारा, एकजुटीचं महत्त्व जाणणारा, घरात धाक पण तरीही अतिरेकी जाच नसणारा, विचारी, आदर्श असा हा माणूस आहे. कोणालाही हवीहवीशी आणि आपलीशी वाटणारी ही व्यक्तिरेखा आहे. विशेषतः लहान मुलांना हे तात्या आजोबा फार आवडतात, हे आता माझ्या लक्षात आलंय’.