दिल्लीतील कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण ४६ लोक सहभागी झाले होते, अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. या ४६ लोकांमध्ये २९ जण हे विदेशातील आहेत. तर इतर सहा जण हे आपल्या देशातील आहेत. त्यातील ३५ जणांना आरोग्य विभागानं ताब्यात घेतलं आहे. इतर ११ जणांचा शोध घेण्यात येत आहे, असंही द्विवेदी यांनी सांगितलं. विदेशी नागरिकांना ज्यांनी थारा दिला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.
यवतमाळमधील १२ जण सहभागी
या संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील १२ जण सहभागी झाले होते. तशी यादी प्रशासनाला मिळाली आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले ५ जण परत आले असून, त्यांना विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. उर्वरित ७ जण अद्यापही जिल्ह्यात परत आले नाहीत. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात गेल्याची किंवा दिल्लीतच थांबले असल्याची शक्यता आहे. तरीही प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
दिल्लीतील संमेलनात सहभागी झालेल्या औरंगाबादमधील सात संशयित व्यक्तींची व त्यांच्या चार नातेवाईकांची बुधवारी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व संशयितांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरीच अलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times