: जिल्ह्यातील नागरिकांनी दोन महिन्यापूर्वीच एक मोठी दंगल अनुभवली. याच दंगलीतून आणखी शांतता मिळत नाही तोच लहान-मोठे गुन्हे शहरात होत असल्याचे दिसत आहे. बडनेरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या एका पान टपरीवरून चक्क पाच किलो व तीन तलवारी जप्त केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते नागपूर महामार्गावरील अकोला वाय पॉईंट स्थित एका पान टपरीवर धाड टाकून ५ किलो ३०० ग्रॅम गांजा व तीन तलवारी जप्त करून पोलिसांनी एकाला पकडले आहे. या प्रकरणी म्हाडा कॉलनी बडनेरा येथील शेख सलमान शेख सलीम (२८, रा. ) या युवकास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

शेख सलमान याची अकोला वाय पॉइंटवर असून, तेथे तो गांजा विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री पान टपरीवर धाड टाकली. पोलिसांनी पानटपरीची झडती घेतली असता, तेथे ५ किलो ३०० ग्रॅम गांजा व तीन तलवारी आढळून आल्या.

पोलिसांनी गांजा व तलवारी असा एकूण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेख सलमानला बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले असून, बडनेरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here