मुंबई: ज्येष्ठ अभिनेते बबन प्रभू, दिलीप प्रभावळकर, अविनाश खर्शीकर, अरुण नलावडे, अश्विनी भावे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी एके काळी अजरामर केलेलं ‘वासूची सासू‘ हे नाटक दर्दी प्रेक्षकांच्या नक्कीच स्मरणात असेल. मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटकाचा हा साज पुन्हा एकदा आजच्या पिढीतील प्रेक्षकांना अनुभवता यावा म्हणून नव्या संचात ‘वासूची सासू’ प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. ‘

अभिजात’ निर्मित आणि प्रदीप दळवी लिखित हे नाटक आता प्रयोगांसाठी सज्ज झालं आहे. नाटकाची तालीम अंतिम टप्यात आली आहे. अभिजीत केळकर यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नाटकात वासू हा पेइंग गेस्ट अण्णा नावाच्या घरमालकाकडे राहात असतो. घरमालकाची बायको खूप शिस्तप्रिय असते. वासूची प्रेयसी शीतल घरी येणार असल्यानं या शिस्तप्रिय मालकिणीला बाहेर पाठवण्याचा डाव रचला जातो आणि ऑफिसला सुट्टी काढायची म्हणून वासू ‘सासू मेल्याचं’ कारण देतो; तेव्हा मेलेल्या सासूला बघायला ऑफिसची सगळी मंडळी येणार असं कळल्यावर सगळ्यांची उडालेली तारांबळ या नाटकात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
अदिती आणि तुझ्यात काय साम्य आहे? अमृता पवार म्हणते, आम्ही दोघीही…
यावेळी नाटकाचं दिग्दर्शन दुर्गेश मोहन यांनी केलं असून नेपथ्य संदेश बेंद्रेचं आहे. अभिजीतसह अंकुर वाढवे, आकाश भडसावळे, स्वप्ना साने, अथर्व गोखले, सुयश पुरोहित, वल्लभ शिंदे, तपस्या नेवे यांच्या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसंच नवोदित अभिनेत्री संजना पाटील यानिमित्त रंगभूमीवर पदार्पण करतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here