मुंबई : द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय टीव्ही शो आहे.जगभरातील प्रेक्षक या शोचे चाहते आहे. यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शोच्या सेटवर आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात.अशातच काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या गहराइयां या चित्रपटाची टीम शोच्या सेटवर दिसणार आहे. ज्यात नेहमी प्रमाणेच शोचा होस्ट कपिल शर्मा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

द कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांनी नुकताच या आठवड्यातील भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमोमध्ये,दीपिकासह अनन्या पांडे,सिद्धांत चतुर्वेदी,धैर्य कारवा आणि दिग्दर्शक शकुन बत्रा दिसत आहे.पुढे प्रोमो मध्ये,कपिल शर्मा नेहमी प्रमाणेच दीपिका पादुकोण सोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.

दीपिकाला फ्लर्ट करत कपिल म्हणाला की, तू आतापर्यंत सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत, ऐतिहासिक चित्रपटापासुन ते सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे असे अनेक चित्रपट तू केले आहे.परंतु,जर कधी तुला विनोदी चित्रपटात काम करावेसे वाटले तर तुला सहकलाकार म्हणून कोण आवडेल.

यावर कपिल तिला काही हिंटही देतो,दीपिकाला बोलत तो म्हणतो की,आज तो मुलगा ट्विटरवर हिट आहे.याला दीपिका उत्तर देते की,कपिल शर्मा असे त्या मुलाचे नाव आहे. पुढे दीपिका म्हणते की,तू मला दिग्दर्शित करावं,आणि त्या चित्रपटात तू माझा सहकलाकार म्हणून काम करावे.दीपिका हसते आणि म्हणते की जर तुला या चित्रपटाची निर्मिती करायची असेल तर ते देखील तू करू शकतो.कपिल यावर म्हणतो की,दीपिकासाठी मी पुन्हा माझी सर्व संपत्ती देण्यास तयार आहे.यानंतर तिथे बसलेले सर्व लोक हसायला लागतात.

रंगभूमीवरील अजरामर नाटक ‘वासूची सासू’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान,गहराइयां हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी ओटिटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा ही गुंतागुंतीच्या नात्यांशी संबंधित आहे. चित्रपटात दीपिकासह अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here