नागपूर : ‘दिल्लीजवळील नोएडा, नागपुरातील रामदासपेठ परिसरात माझ्या नावे असलेले आलिशान फ्लॅट, फोर्ड एंडेव्हर, मर्सिडिझसारख्या आलिशान गाड्या माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हडपल्या,’ असा आरोप त्यांच्या घरी काम करणाऱ्या सूरज तातोडे नावाच्या माजी कर्मचाऱ्याने केला आहे. तो त्यांचा जवळचा नातेवाइकही आहे. दरम्यान, ‘हा फक्त ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे,’ असे म्हणत बावनकुळेंनी सगळे आरोप फेटाळले आहेत.

‘बावनकुळेंच्या पत्नी या नात्याने माझ्या मावशी लागतात. त्यामुळे मी त्यांच्या घरी महिना पंचवीस हजार रुपये पगारावर कामास होतो. घरी पडेल ते काम करीत होतो. बावनकुळे मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे हिशेब ठेवण्याचे काम सोपविण्यात आले. २०१८ साली एक कोटी रुपयांच्या हिशोबात तीस लाखांचा गोंधळ झाल्याने त्यांनी माझ्याकडून ही जबाबदारी काढून घेतली. त्यामुळे माझे बीपी वाढले आणि अर्धांगवायू झाला. त्यानंतर त्यांच्या लोकांनी माझ्याकडील मालमत्ता बळकावणे सुरू केले. बावनकुळेंनी विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमविले,’ असा आरोपही तातोडे यांनी केला. जी घरे हडपल्याचा आरोप तातोडेंनी केला, त्याची मूळ कागदपत्रे सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन गाड्यांचे आरसी बुकही दाखविले.
वर्ध्यातील ७ भावी डॉक्टरांच्या अपघातापूर्वीचा VIDEO आला समोर, दृश्य पाहून तुम्हीही हादराल

हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार : बावनकुळे

‘सूरज तातोडे हा आमचा नातेवाइक आहे. बेरोजगार असल्याने त्याला काम दिले. ब्रेन हॅमरेज झाले तेव्हा उपचार करून त्याचा जीव वाचवला. आता तो सतीश उकेंच्या माध्यमातून तीन वर्षांपासून मला त्रास देत आहे. मी त्याच्याकडून कुठलीही मालमत्ता घेतलेली नाही. माझ्या परिवारात कुणी घेतली असेल तर त्याची रजिस्ट्री कार्यालयात जाऊनच झाली असेल. हा विनाकारण मला आणि परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, त्यास गांभीर्याने घेण्याची गरज नाही,’ असे बावनकुळे म्हणाले.

लालपरी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासनाचे नवे प्रयत्न, ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काढला ‘हा’ मार्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here