मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊ आणि त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. धारावी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हायलाइट्स:
- मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांचे आंदोलन
- हिंदुस्थानी भाऊसह दोघांना अटक
- धारावी पोलिसांनी केली अटकेची कारवाई
- विद्यार्थ्यांना चिथावल्याचा आरोप
करोना काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी काल, सोमवारी मुंबईतील धारावीत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालत हे आंदोलन केले होते. या आंदोलनाचे लोण पुणे, नागपूर आणि राज्यातील इतर भागात पसरले. हिंदुस्थानी भाऊ याने यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे हे आंदोलन उभे राहिले असल्याचे समोर आले.
हिंदुस्तानी भाऊनं भडकावलं,पोरांनी बंडाचं निशाण फडकावलं
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: मुंबईतील सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला धारावीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून