सोने-चांदीचे दर: अर्थसंकल्पापूर्वी सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. सोन्याच्या दरात किलोमागे एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज भारतात २२ कॅरेट सोन्याची किंमत ४४,९०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. यामुळे जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ताज्या व्यवहारानंतर सोन्याचा भाव ४७,५०७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला आहे. इतकंच नाहीतर यावेळी चांदीचा भाव ६०,९४१ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

दरम्यान, काल दिल्लीत सोन्याचा भाव ४४,९०० रुपये होता. Goodreturn च्या वेबसाईटनुसार, मुंबईतही सोन्याचा भाव ४४,९०० रुपये होता, तर आज दिल्लीत सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.

Union Budget 2022 Update: सामान्यांच्या खिशावर अर्थसंकल्पाचा काय परिणाम? काय स्वस्त काय महाग याकडे लक्ष

goodreturns.in वर देण्यात आलेल्या किंमती खालीलप्रमाणे…

चेन्नईमध्ये १० ग्राम सोन्याची किंमत : ४५,२७०

मुंबईत १० ग्रॅम सोन्याची किंमत : ४४,९००

दिल्लीत १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,९००

कोलकातामध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,९००

बंगळुरूमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,९००

हैदराबादमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,९००

केरळमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,९००

पुण्यात १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,८५०

अहमदाबादमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४५,००० रुपये आहे

नागपुरात १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,९००

नाशिकमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत: ४४,८५०

सोमवारी काय होता सोन्या-चांदीचा भाव ?

कमॉडिटी बाजारात आज सोमवारी सोन्याच्या किमतीवरील दबाव कायम होता. सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव १६० रुपयांनी घसरला. चांदी मात्र २०० रुपयांनी महागली होती. Goodreturns या वेबसाईटनुसार, सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४९०० रुपये इतका होता. २४ कॅरेटचा भाव ४८९९० रुपये इतका होता. त्यात १०० रुपयांची घसरण झाली. शनिवारी सोने १५० रुपयांनी स्वस्त झाले होते.
Union Budget 2022 : ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो मोठा दिलासा, ‘या’ आहेत अपेक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here