हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर कलगाव पाटीजवळ भरधाव ट्रक व आयशर टेम्पोची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पवन शंकर गायकवाड (रा. नांदेड), मेहमुदखान (रा. सीपाहियोंका मोहल्ला, नागौर, राजस्थान) अशी दोन मयतांची नांव असून एकाचे नांव समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून एका आयशर टेम्पो मोसंबी घेऊन नांदेडकडे निघाला होता. सदर टेम्पो हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर कलगाव पाटी जवळ आला असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.आरजे-२१-जीए-५५३२) टेम्पोला धडक दिली. या अपघातात ट्रकमधील दोघेही ठार झाले त्यापैकी चालकाचे नांव महेमुदखान असून अन्य एकाचे नांव समजू शकले नाही. तर टेम्पोमधील पवन गायकवाड याचा मृत्यू झाला. तसेच टेम्पोमधील करण अशोक कदम हा गंभीर जखमी झाला.

लालपरी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासनाचे नवे प्रयत्न, ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काढला ‘हा’ मार्ग
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मुपडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल भडंगे, नागूलकर, रवीकांत हरकाळ, आकाश पंडीतकर, अशोक धामणे, गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी किरण यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले आहे.

या अपघातामुळे हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी रात्रीच क्रेन बोलावून वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही तर ट्रकमधील एका मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजकारणात खळबळ! नाना पटोलेंविरोधात सोनिया गांधींना पत्र, थेट पायउतार करण्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here