मुंबई: मालिकांचे प्रमोशन किंवा मालिकेची उत्सुकता निर्माण करण्यासाठी नवीन फंडे काढले जातात. त्यासाठी मालिकांमध्ये काही दृश्य अतिरंजित केली जातात. हिंदी मालिकांमध्ये हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. कधी-कधी हे आता अती होतंय, असंही प्रेक्षक म्हणतात. अश्याच एका हिंदी मालिकेची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. मालिकेत दाखवण्यात आलेलं एक दृश्य पाहून प्रेक्षकांनी डोक्याला हातंच लावला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे ‘थपकी प्यार की २’ या मालिकेतील. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी या मालिकेला प्रचंड ट्रोल केलं आहे. आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं…असं अनेकांनी म्हटलं आहे. तर हे सर्व पाहून हसू हसू आवरणं कठीण होतंय असंही बऱ्याच नेटकऱ्यांनी म्हटलंय.
Video- गुरू रंधावाच्या समोरच कृष्णाने केलं नोरा फतेहशी फ्लर्ट, लस घेण्यावरून उडवली थट्टा

काय आहे हा व्हिडिओ?
व्हायरल झालेला हा व्हिडिओ १.६ मिनिटांचा आहे. यात सुरुवातीला एक महिला मुद्दाम तिच्या हातातले सेल खाली टाकताना दिसते. या खाली पडलेल्या सेलवर पायपडून एक वृद्ध महिला घसरून पडत असते. तितक्यात या वृद्ध महिलेचा हात बाजूलाच असलेल्या एका महिलेच्या हातातील पुजेच्या ताटावर पडतो. त्यामुळं हे पुजेचं ताट हवेत फेकलं जातं. त्यातील पुजेचं साहित्य हवेत इतरत्र पसरल्याचं दिसून येतंय. तर तिथंच उभी असलेली एक महिला आता येणार कुंकवाचा पाऊस ( सिंदूर वर्षा) असं म्हणत असते. त्यानंतर मालिकेतील मुख्य अभिनेत्री तिला धक्का मारून पाडते. तर वरून पडलेलं कुंकू स्वत:च्या हातात झेलते. असा हा सगळा ड्रामा पाहून प्रेक्षकांनी डोक्यावर हात मारला आहे. हे दृश्य पाहून नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल केलं आहे.

हे सर्व पाहून असा सगळा खटाटोप कशा साठी असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here