मुंबई :प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर ‘येऊ कशी तशी मी नांदायला‘ ही मालिका आता निरोप घेणार असल्याचं समजतं. अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी मालिकेतील त्यांच्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अन्वितानं साकारलेली अवनी ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची व्याख्या तिनं तिच्या अभिनयातून बदलली; असं प्रेक्षक आवर्जून सांगतात. तिचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांना आपलासा वाटला. पण, आता ही मालिका अंतिम टप्यात आली आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय.
video: मालिकेतील सीन पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात, म्हणाले हा खटाटोप कश्यासाठी
या मालिकेच्या जागी स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर अभिनित ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सुरु होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचा शेवट नेमका कसा करणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
‘या’ मालिकेत दिसणार स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर , प्रोमो होतोय व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here