राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईत सध्या एकूण १६२ करोनाबाधित आहेत. राज्यातील करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या ५३४३ एवढी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांचीही चाचणी केली जाणार आहे.’
राज्यात आता संशयितांची चाचणी वेगाने करण्याचं आव्हान रुग्णालयांसमोर आहे. मुंबईत ५ सरकारी आणि ७ खाजगी रुग्णालयांमध्ये चाचणी केली जात आहे. एका दिवसाला दोन हजार चाचण्या केल्या जाण्याची क्षमता सध्या मुंबईत आहे. याशिवाय अतिरिक्त मास्क आणि व्हेंटिलेटर्सचीही तयारी केली जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
करोना व्हायरसची साथ वेगाने पसरत असून महाराष्ट्रात करोनाग्रस्तांचा आकडा ३२० वर पोहोचला आहे. तर, या आजारामुळं आतापर्यंत १२ जणांचे मृत्यू झाले आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही साथ वाढत असल्यानं प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेतही भर पडली आहे. ३२० पैकी ३९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई १६२, पुणे ३८ आणि त्यानंतर सांगलीत २५ रुग्ण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवड, नागपूर, बुलडाणा अशा विविध जिल्ह्यांमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times