मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राला अभिनेता अर्जुन कपूरचा फोन नंबर डिलीट करायचा आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अर्जुनने अभिनेत्रीला ट्रोल केलं. तिने प्रियांका चोप्रा तिची खरी मोठी बहीण असल्याचंही यावेळी सांगितलं. परिणीती चोप्रा इन्स्टाग्रामवर सक्रिय असते आणि अलीकडेच तिने प्रश्न- उत्तरांचं एक सेशनही ठेवलं होतं, ज्या दरम्यान तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अभिनेत्रीने चुलत बहीण प्रियांकापासून ते सहकलाकारांपर्यंत अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.

तुला ऐकायचं नाहीए

एका प्रश्नाला उत्तर देताना परिणीती चोप्राने अर्जुन कपूरची थट्टा उडवली. जेव्हा चाहत्याने परिणीतीला अर्जुनबद्दल काही लिहिण्यास सांगितलं तेव्हा अभिनेत्रीने उत्तर दिलं की, ‘काही ओळीदेखील खूप जास्त होतील.’ यावर अर्जुनने उत्तर देताना लिहिले की, ‘तुझा आवाज ऐकण्या लायक नाही. चांगलं हे होईल की तू कमी बोलत जा.’ यावर परिणीतीनेही पलटवार करत लिहिलं की, ‘मी स्वतःच आता तुझा नंबर डिलीट करते.’

परिणीतीचं इन्स्टा स्टेटस

प्रियांका जागतिक स्टार आहे

एका चाहत्याने परिणीतीला प्रियांकाबद्दल प्रश्न विचारला की तिला तिच्या बहिणीमध्ये सर्वात जास्त काय आवडतं? उत्तरात परिणीतीने लिहिले की, ‘ती जागतिक स्टार आहे. ती माझ्यासाठी सख्खी मोठी बहीण आहे. माझ्या सख्ख्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी आहे, म्हणूनच ती माझी मोठी बहीण आहे. जेव्हा परिणीतीला करण जोहरबद्दल काही बोलायला सांगितलं, तेव्हा तिने लिहिले की, ‘भला करेग जोहर करेल, धुंडेगा मेरा शोहर.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here