कराची, पाकिस्तान :

भारतातील गुजरातच्या सीमेपासून अवघ्या ६० किमी अंतरावर असलेल्या ‘थारपार्कर‘ भागात पाकिस्तानच्या हाती मोठं घबाड लागलंय. ‘ब्लॅक गोल्ड‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळशाचे प्रचंड साठे या भागात आढळून आलेत.

उल्लेखनीय म्हणजे, भारत – पाकिस्तानच्या सीमेवरील सिंध प्रांतातील या कोळशाचा सुगावा एका चिनी कंपनीला लागलाय.

पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळशाचा हा साठा जवळपास ३ अब्ज टनांचा आहे, जो ५ अब्ज बॅरल कच्च्या तेलाच्या समतुल्य आहे. प्रांत सरकारला मिळालेलं हे दुसरं सर्वात मोठं यश असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मुराद अली शाह यांच्या म्हणण्यानुसार, थारपार्कर कोळसा ब्लॉक-१ मध्ये ३ अब्ज टन कोळसा आढळून आलाय. जवळपास १४५ मीटर खोदल्यानंतर हा कोळसा सापडला. ‘थारपार्कर प्रदेश पाकिस्तानचं नशीब बदलू शकेल’, अशी घोषणा मुराद अली शाह यांनी आधीच केली होती. आता मात्र नैसर्गिक खजिन्यामुळे त्यांची ही घोषणा खरी ठरलीय.

Pakistan Turkey: तुर्कीशी हातमिळवणी करत पाकिस्तान काश्मीरमध्ये कोणता डाव रचणार?
Dhandhuka Murder: पाक मौलाना साद रिजवीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि गुजरात हत्याकांडाचा संबंध समोर

पाकिस्तानला अरबो डॉलर्सचा फायदा मिळणार

थार भागातील कोळशाचा हा शोध एका चिनी कंपनीला लागला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत ‘थार कोळसा ब्लॉक-१’ उभारण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये किंमतीच्या या खजान्याच्या शोधामुळे आनंदानं न्हाऊन निघालेले सिंधचे ऊर्जामंत्री इम्तियाज अहमद शेख यांनी ‘कोळशाच्या खाणीचा हा शोध सुवर्णयुगाची सुरुवात’ असल्याचं म्हटलंय. पहिल्या टप्प्यात कोट्यवधी टन कोळसा काढला जाईल, असा खुलासाही त्यांनी केला. या कोळशामुळे देशातील सध्या सुरू असलेलं ऊर्जा संकटही दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्जाच्या कचाट्यात आणि आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला या कोळशाच्या खजिन्यामुळे अब्जावधी डॉलर्सचा फायदा मिळू शकणार आहे.

Defence Budget 2022 : संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरते’साठी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Justin Trudeau: ‘भूमिगत’ पंतप्रधान जस्टिन ट्रुडो नागरिकांसमोर; सांगितलं ‘गायब’ होण्यामागचं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here