स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘केंद्राच्या अर्थसंकल्पात शेती सुधारणेच्या नावाखाली स्वप्नांचा मनोरा बांधलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये यामध्ये काहीच नाही. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प आहे. कृषिक्षेत्रामध्ये डिजीटल क्रांती करण्याची भाषा अर्थमंत्र्यांची भाषा फसवी आहे. वस्त्रोद्योगासाठी काहीच तरतूद नाही. साखर उद्योगाला काहीच दिलेले नाही. गेल्यावर्षी एकूण बजेटच्या ४.३६ टक्क्यांची तरतूद ही शेतीसाठी होती. यावर्षी ती ३.७६ टक्क्यांवर ही तरतूद आणलेली आहे. म्हणजे ०.७५ टक्क्यांनी तरतूद कमी केली आहे. अतिशय निराशाजनक अर्थसंकल्प असून यामुळे शेतीमध्ये सुधारणा होणार नाहीत,’ असा घणाघात शेट्टी यांनी केला आहे.
हसन मुश्रीफांचाही हल्लाबोल
केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. या अर्थसंकल्पाकडून घोर निराशा झाली आहे. विशेषता: हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, दीनदलित यासारख्या “नाही रे” वर्गापासून कोसो दूर आहे. कारण राबणाऱ्या हातांसाठी कोणतीच तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही, असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
जुमला ठराव
‘ज्या घोषणांची कधीच अमंलबजावणी होणार नाही, अशा पोकळ घोषणा करण्याची केंद्र सरकारची सात वर्षाची पंरपंरा यंदाही कायम राहिली आहे. करोनामुळे अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पात दिलासा मिळेल अशी शक्यता होती, मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला आहे,’ अशा शब्दांत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाजप नेत्यांकडून कौतुक
एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अर्थसंकल्पावर टीका होत असताना भाजप नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचे फायदे सांगितले आहेत. ‘प्रत्येक क्षेत्राला उर्जा देणारा आणि न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला किमान हमीभाव, रस्ते बांधणी, रोजगार निर्मिती, देशाच्या लष्करी सामर्थ्याला पुरक धोरण, पायाभूत सेवासुविधा, आरोग्य यंत्रणेचं बळकटीकरण, डिजीटल शिक्षणाला चालना, ई-पासपोर्ट धोरण, सहकार क्षेत्राला दिलासा, इथेनॉल निर्मितीला वेग, राज्यांच्या विकासासाठी १ लाख कोटींचा निधी ही अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत सकारात्मक असा अर्थसंकल्प आहे,’ असं भाजप प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.
अभ्यासकांचं काय आहे म्हणणं?
‘पश्चिम महाराष्ट्र हा सधन आहे. येथे मिळणारा महसूल, उद्योग, शेती, रोजगार क्षमता या सर्वांचा विचार करता या भागाला अर्थसंकल्पात प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने या भागाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे,’ असं आर्थिक विषयांचे अभ्यासक व्ही. बी. ककडे यांनी म्हटलं आहे.
Publicar imágenes en las redes sociales por 200 dólares al día
Este trabajo a distancia es para los entusiastas de los medios sociales como tú, a quienes les encantaría ganar un ingreso por ello. Si utilizas plataformas de medios sociales como Facebook, Instagram, Twitter, etc, entonces puedes solicitar este trabajo. Una empresa de fabricación de juguetes para niños está buscando personas normales y corrientes que gestionen su cuenta en las redes sociales en su nombre. Todo lo que tienes que hacer es descargar contenido preconfeccionado (principalmente fotos) y publicarlo en la cuenta de redes sociales que se te proporcionará.
https://bit.ly/3MmleF0