कोल्हापूर : फुकट भेळ खाणे आणि भेळीच्या गाड्याजवळ थुंकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कोल्हापुरातील सुप्रसिद्ध ‘राजाभाऊ भेळ’चे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आभिषेक सरदार, गणेश यलगट्टी, प्रथमेश गायकवाड यांचा यामध्ये समावेश आहे. (कोल्हापूर क्राईम न्यूज अपडेट)

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगाव येथील काही तरूण आठ दिवसांपूर्वी खासबाग मैदानाजवळच्या खाऊ गल्लीत गेले होते. त्यांनी तेथील व्यवसायिकांकडून खाद्यपदार्थ मागितले. त्यानंतर पैसे न देताच ते निघून जात होते. त्यावेळी या तिघांसोबत खाऊ गल्लीतील व्यावसायिकांचा वाद झाला. त्यातून एका तरुणाला व्यवसायिकांनी मारहाण करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यास समज देऊन सोडले.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्यावर लखनऊमध्ये अ‍ॅसिड हल्ला?; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

घडलेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ३ तरूण शस्त्र घेऊन खासबाग नजीक असलेल्या महिला बँकेच्या गाळ्यातील शिंदे यांच्या दुकानाजवळ गेले. त्यांनी थेट गल्ल्यात हात घालून पैसे घेतले. रवींद्र उर्फ बापू शिंदे यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. दरम्यान शिंदे हे सावध असल्याने त्यांनी हा हल्ला परतवून लावला. यादरम्यान खाऊ गल्लीतील व्यवसायिक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांपैकी एक जण पळून गेला असून दोघांना व्यावसायिकांनी बेदम चोप दिला.

दरम्यान, सायंकाळी शिंदे यांची रीतसर फिर्याद घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करत अभिषेक सरदार, गणेश यलगट्टी या दोघांना अटक केली, तर तिसरा संशयित प्रथमेश गायकवाड याचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here