कोल्हापूर : कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर राधानगरी तालुक्यातील तिटवे-तुरंबे परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कौलव येथील तरुणाचा मृत्यू झाला. सुजित सदाशिव सुतार (वय २६,) असं मृत तरुणाचं नाव आहे, तर दीपक लोहार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. (Kolhapur Accident News)

जखमींवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. राधानगरी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Urusha Rana: ‘माझ्या वडिलांना नाही, योगींना लखनऊ सोडावं लागणार’; उरुषा असं का म्हणाली?

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, कौलव येथील सुजित सुतार व दीपक लोहार हे दोन युवक मुदाळतिट्टा येथे मोबाईल खरेदी करण्यासाठी गेले होते. मुदाळतिट्टा येथून परत येत असताना वाघवडे गावातील समोरून येणाऱ्या मोटारसायकलशी त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. त्यामध्ये सुजित सुतार या तरुणाच्या डोक्याला मोठी इजा झाली. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेमुळे कौलव गावावर शोकळळा पसरली असून तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here