औरंगाबाद : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील २५ वर्षांची ‘ब्लू प्रिंट’ म्हणून अर्थसंकल्प सादर केला. त्यातील योजनांविषयी निश्चित आशा आहे. मात्र, आम्हाला पुढच्या २५ दिवसांच्या ‘बजेट’ची चिंता पडली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे महागाईत भर पडली. साधे तेलाचे दरही कमी व्हायला तयार नाहीत. या अर्थसंकल्पाने आम्हाला काय दिले हे मला कळले नाही, अशी प्रतिक्रिया योगिता कोरडे या गृहिणीने दिली.

कोरडे यांचे पाच जणांचे कुटुंब. त्यांचे पती एका कंपनीत कामाला आहेत. त्यांची नणंदही कंपनीत काम करून कुटुंबाला हातभार लावते. अन्य कुटुंबांप्रमाणे कोरडे कुटुंबालाही पाण्याचे बिल, विजेचे बिल, सिलिंडर, किराणा,औषधी, पेट्रोल यांवर नियमित खर्च करावा लागतो. त्या म्हणाल्या, ‘सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामधल्या योजना खूप चांगल्या आहेत. अगदी नदीजोड प्रकल्प ते पुढील २५ वर्षांचे नियोजन दिसून येते. पण सध्या माझ्या कुटुंबाला महागाईची झळ सोसावी लागते. पेट्रोलचे दर वाढल्याने आम्ही अगदी आवश्यक असेल, तिथेच गाडी वापरतो किंवा एकाच मार्गाने कामाचे नियोजन करतो. लॉकडाउनपासून तेलाच्या किंमती दुपटीने वाढल्या. मोबाइल, डीटूएच्या रिचार्जचे दर वाढले आणि रिचार्जचे दिवस कमी केले. माझ्या कुटुंबात सासूबाईंना मधुमेह असल्याने त्यांना वेळच्या वेळी आणि दर महिन्याला औषधी लागतात. मुलगा अवघा दोन वर्षांचा असल्याने त्यालाही नियमित औषधी आणि दवाखान्यात न्यावे लागते. करोना काळात औषधांचे दरही वाढले आहेत. सिलिंडरचे दर ९७० रुपयांवर पोहोचले आहेत. कितीही काटकसरीने नियोजन केले तरीही मध्यमवर्गीय कुटुंब बचत कधी करणार? पुढील २५ वर्षांचे नियोजन करताना आमच्या वर्तमानात किमान जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या असत्या तरीही खूप दिलासा मिळाला असता.’

अर्थसंकल्प २०२२; रुपया असा येणार आणि असा खर्च होणार
प्रत्येक स्त्री तिला सुचेल तशी गुंतवणूक करते. कधी घरखर्चातील पैसे बाजूला ठेवून तर कधी आहे त्या पैशाचे सोने घेऊन. ही सगळी भविष्याची तरतूद आहे. या दृष्टिकोनातून निर्मला सीतारामन यांच्या बजेटचे मी स्वागत करते. पण आम्हाला महागाईतून सुटका मिळेल अशी अपेक्षा होती. तो दिलासा मात्र मिळाला नाही.

budget 2022 : अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून ‘चिरफाड’! चिदम्बरम बरसले, ”अमृतकाल’ उजाडेपर्यंत वाट बघायची का?’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here