जालना बातम्या लाईव्ह: दुर्दैवी! ट्रक थांबवून पाणी आणण्यासाठी गेला तो परतलाच नाही, शोध घेतला असता धक्कादायक माहिती उघड – a cleaner of a truck has died in a collision with an unknown vehicle
जालना : सध्याच्या कलयुगात कोणाचा कसा मृत्यू होईल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला ट्रक थांबून स्वयंपाक बनविण्यासाठी पाणी आणायला गेला तो परतलाच नाही. ट्रकच्या क्लिनरचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान जालना ते भोकरदन रोडवरील मानदेऊळगाव शिवारातील कुक्कुटपालन जवळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभी करून जेवण बनविण्यासाठी थांबले होते. ट्रक चालक शंकरसिंग हे स्वयंपाकाची तयारी करीत असतांना रोड पार करून क्लिनर प्रेम योगी हे पाणी आणण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्यामुळे शोधाशोध केली असता प्रेम योगी यांचा रोडवर अस्थव्यस्त पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने त्यांचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.