हातकणंगले येथील त्या तरुणाला दोन दिवसांपूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सीपीआरमध्ये आणण्यात आले. त्याला श्वसनाचा विकार होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तर दुसरी मृत व्यक्ती कसबा बावडा येथील ८५ वर्षीय महिला होती. तिच्यावर कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला २६ मार्चला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला श्वसनाचा त्रास होता. उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसाच्या विकारामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times