नाशिकमधील सातपूर एमआयडीसीत एका कंपनीत पहाटे भीषण आग लागली. कंपनीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. १२ अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले होते. पहाटेपासून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

हायलाइट्स:
- नाशिकमधील सातपूर एमआयडीसीत आगडोंब
- कंपनीतील गोदामात भीषण आग
- पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठी वित्तहानी
- १२ अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न
सातपूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर ३४ ए निलराज इंजीनियरिंग या कंपनीत सकाळी सव्वा पाच वाजता आग लागली. कंपनीच्या पहिल्या मजल्यावर कॅपॅसिटरसाठी लागणारे ॲल्युमिनियम कॅपच्या गोदामाला आग लागली होती. या आगीत ॲल्युमिनियम कॅप व खोके जळून खाक झाले. नाशिक महानगरपालिका, एमआयडीसी व महिंद्रा अँड महिंद्राच्या अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत १२ अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: नाशिक सातपूर मिडसी परिसरातील कंपनीला भीषण आग
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून