नागपूर : विद्यार्थ्यांची माथी भडकावून त्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊवर नागपुरातसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी त्याला नागपुरात आणले जाणार आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास फाटक याच्या चिथावणीला बळी पडून शेकडो विद्यार्थ्यांनी ‘दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊ नये’, या मागणीसाठी सोमवारी दुपारी मेडिकल चौकात आंदोलन केले. याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांनी मनपाच्या बसची तोडफोड करून आंदोलनाला हिंसक वळण दिले होते. त्यामुळे अजनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. भाऊला मुंबई पोलीसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु, भाऊविरुद्ध नागपुरातही गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे नागपूर पोलीस त्याला अटक करून नागपुरात आणणार आहेत.

दुर्दैवी! ट्रक थांबवून पाणी आणण्यासाठी गेला तो परतलाच नाही, शोध घेतला असता धक्कादायक माहिती उघड
विद्यार्थ्यांची शोधाशोध

आंदोलनात सहभागी युवकांविरूद्ध पोलीस कारवाई करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या चित्रफिती, छायाचित्रांवरून पोलीस युवकांचा शोध घेत आहेत. असे आंदोलन परत होऊ शकते, याची कल्पना पोलीसांना आली आहे. त्यामुळे त्यांनी पूर्वतयारी केली आहे. गैरकायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

धक्कादायक! करोनाची लस घेतल्यानेच मुलीचा मृत्यू; पित्याने न्यायालयात भरपाई म्हणून मागितले तब्बल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here