Nilesh Rane : आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या आवारातच हा व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंधुदुर्ग न्यायालयात पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270,  तसेच  पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजप कार्यकर्त्यांची गर्दी आणि आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्यानंतर पोलिसांशी भाजप कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची आणि बेकायदेशीर गर्दी जमवणं, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणं यासह अन्य कारणं दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकाना शिवसेनेने आमदार वैभव नाईक यांनी निवेदन दिलं आहे. त्यात त्यांनी पोलिसांना राणेंच्या समर्थकांनी पोलिसांना शिवीगाळ केली असून अरेरावी केली आहे. तसेच जमावबंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्रित केला याप्रकरणी गुन्हे दाखल करावं, असं निवेदन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी पोलीस अधिक्षकांना दिलं आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार  वादात अडकले आहेत. हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी सुरु आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतला. ज्यानंतर कोर्टाने आपला निर्णय आज (मंगळवारी) दुपारी सुनावण्यासाठी राखून ठेवला होता. दरम्यान कोर्टाने आज नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी सुप्रीम कोर्टानं त्यांना 10 दिवसांची मुदत दिल्यानं पोलीस त्यांना अटक करु शकलेले नाहीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here