इस्लामाबाद, पाकिस्तान:

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सोमवारी एका अल्पसंख्यांक समाजातील व्यापाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळी घालून हत्या करण्यात आलीय. मृत हिंदू व्यापाऱ्याचं नाव सुतान लाल देवान असं असल्याचं समजतंय. घोटकी जिल्ह्याच्या डहारकी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. दहर समाजातील काही प्रभावशाली तत्त्वांकडून हिंदू व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

हत्येअगोदर काही दिवसांपूर्वी आपल्याला काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार सुतान यांनी पोलिसांत नोंदवली होती. ‘जिवंत राहायचं असेल तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात असल्याचं म्हणत सुतान यांनी पोलिसांकडे मदतीची याचना केली होती. ‘पाकिस्तान हीच आपली मायभूमी आणि कर्मभूमी’ असल्याचं सांगत सुतान यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचंही स्पष्टपणे म्हटलं होतं.

​गुजरातपासून ६० किमी अंतरावर पाकिस्तानात सापडलं ‘काळ्या सोन्याचं’ घबाड, नशीब पालटणार​
Pakistan Turkey: तुर्कीशी हातमिळवणी करत पाकिस्तान काश्मीरमध्ये कोणता डाव रचणार?
भाच्यावर केला होता आरोप

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘फ्रायडे टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, सुतान एका कपड्यांच्या कारखान्याचं उद्घाटन करून आपल्या घरी परतत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असणारा एक नातेवाईक हरीश कुमार हेदेखील गंभीर जखमी झालेत. हरीश कुमार यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

मृत्यूपूर्वी हल्ल्यात जखमी झालेल्या सुतान लाल यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये आपल्यावर हल्ला झाला असून आपल्या जीवाला धोका असल्याचं सुतान लाल म्हणत असताना दिसून येत आहेत. जमिनीच्या वादातून आपल्या भाच्यानंच इतर चार जणांसहीत आपल्यावर हल्ला केल्याचंही सुतान यांनी या व्हिडिओत म्हटलं.

अल्पसंख्यांक समाजावर हल्ला?

अल्पसंख्यांक समाजातील व्यापाऱ्याला कट्टरतावाद्यांकडून निशाण्यावर घेतलं जाण्याची ही गेल्या काही दिवसांतली दुसरी घटना आहे. या हत्येनंतर स्थानिक हिंदू आणि मुस्लीम समुदायाकडून दहर्की स्टेशनच्या समोर जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येतंय.

व्यापाऱ्याच्या हत्येविरोधात या भागातील दुकानं बंद ठेवण्यात आली. पाकिस्तानातील विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज गटाकडून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. एका ख्रिश्चन व्यापाऱ्याच्या हत्येनंतर आता एका हिंदू नागरिकाची हत्या करण्यात आल्याचं म्हणत देशात अल्पसंख्यांकांना सर्वाधिक धोका आणि भीती सतावत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सुटकेचा नि:श्वास! न्यूझीलंडची ‘ती’ गर्भवती पत्रकार मायदेशी परतणार
Justin Trudeau: ‘भूमिगत’ पंतप्रधान जस्टिन ट्रुडो नागरिकांसमोर; सांगितलं ‘गायब’ होण्यामागचं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here