मुंबई: दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली युट्युबर विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याला धारावी पोलिसांनी अटक केली होती. कोर्टाने त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मंगळवारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आज, बुधवारी मुंबई पोलिसांनी धारावी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बुधवारी १२ वाजताच्या सुमारास सर्व जण धारावी पोलीस ठाण्याच्या समोर मोठ्या संख्येने एकत्र या, असे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांवर अधिक दबाव टाकण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र या, असा उल्लेख त्यात होता. जास्तीत जास्त मुलींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, कारण त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर करणार नाहीत, असेही त्यात म्हटले होते.

Mumbai Protest: धारावी आंदोलनाची चौकशी होणार; ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या अटकेची शक्यता, अटकपूर्व जामिनासाठी वकिलांकडे धाव?
Hindustani Bhau arrested: हिंदुस्थानी भाऊला अटक, विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप

वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर पहारा

विद्यार्थी आंदोलनाच्या शक्यतेमुळे मुंबई पोलिसांनी धारावी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही बंदोबस्त वाढवला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धारावी परिसरात विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले होते.

विद्यार्थी स्वत:हून रस्त्यावर उतरणार नाहीत, कोणीतरी ठरवून षडयंत्र रचलंय; दोषींवर कठोर कारवाई करु: गृहमंत्री

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘मी ग्रुपचा अॅडमिन अमान बोलत आहे. मी वांद्र्याहून आलो आहे. वकिलांना विचारणा केल्यानंतर भाऊ इथे नाही असे कळले. भाऊला निघून अर्धा ते पाऊण तास झाला आहे. आता तो धारावी पोलीसांच्या कोठडीत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचा. मी धारावीला जात आहे. सर्वाधिक मुलींनी आंदोलन सहभागी होण्याची आवश्यकता आहे. मुली अधिक असल्या तर, पोलिसांना बळाचा वापर करता येणार नाही.’ ही ऑडिओ क्लिप भाऊला पोलीस कोठडीत रवाना केल्यानंतरची असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मी बाहेर येईपर्यंत कुणीही कोणत्याही प्रकारची कृती करू नये, असे आवाहन हिंदुस्थानी भाऊने केल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली. दरम्यान, हिंदुस्थानी भाऊने कोर्टात माफी मागितली आहे. आमचा हेतू योग्य होता. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आलो होतो. पण दुर्दैवाने त्याचा दुरुपयोग करण्यात आला. आम्ही चौकशीत पोलिसांना सर्व सहकार्य करू, असे वकील महेश मूल्या यांनी सांगितले.

तब्बल १५ कलमं लावत हिंदुस्थानी भाऊला दणका; मुंबई पोलिसांकडून अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here