मुंबई: मुंबईतील धारावीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली युट्युबर विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या हिंदुस्थानी भाऊने सर्व विद्यार्थ्यांना बुधवारीही एक आवाहन केले आहे. त्याचे वकील अशोक यांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत तो स्वतः एखादा व्हिडिओ प्रसिद्ध करत नाही आणि आंदोलन करण्यास सांगत नाही, तोपर्यंत कुणीही कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शने करू नयेत, असे आवाहन भाऊने विद्यार्थ्यांना केले आहे.

‘काही लोक माझ्या नावाने आराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माझ्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की आपापल्या घरी राहा. कोणतेही ट्वीट, व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नका,’ असे आवाहन भाऊने केले आहे. भाऊचे वकील अशोक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यांनी सांगितले की, मी आताच भाऊची भेट घेऊन आलो आहे. त्याच्या सांगण्यावरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करत आहे, असे वकिलांनी सांगितले.

Hindustani Bhau : हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी…; ‘त्या ऑडिओ क्लिपनंतर धारावीत वाढवली सुरक्षा
Mumbai Protest: धारावी आंदोलनाची चौकशी होणार; ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या अटकेची शक्यता, अटकपूर्व जामिनासाठी वकिलांकडे धाव?

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी मुंबईतील धारावी आणि राज्यातील इतर भागांत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. ते आंदोलन हिंदुस्थानी भाऊ याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाला होता, असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात धारावी पोलिसांनी मंगळवारी भाऊला अटक केली आहे. त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर समाजमाध्यमांत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. बुधवारी दुपारी मोठ्या संख्येने धारावी पोलीस ठाण्याच्या परिसरात विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, असे या क्लिपमध्ये म्हटले होते. त्यामुळे पुन्हा विद्यार्थी आंदोलन होण्याच्या शक्यतेमुळे धारावीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे, हिंदुस्थानी भाऊने स्वतः आपल्या वकिलांमार्फत विद्यार्थ्यांसाठी संदेश दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ, ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नका. मी जोपर्यंत बाहेर येत नाही, किंवा एखादा व्हिडिओ जारी करत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शने करू नयेत, असे आवाहन त्याने केले आहे.

Hindustani Bhau arrested: हिंदुस्थानी भाऊला अटक, विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप

तब्बल १५ कलमं लावत हिंदुस्थानी भाऊला दणका; मुंबई पोलिसांकडून अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here