काही दिवसांपूर्वी तो दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता विक्रमला भेटला होता, त्यावेळी त्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता धोनीचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनी टेनिस खेळताना दिसत आहे. सध्या धोनी चेन्नईत मेगा लिलावाची तयारी करत असून संघासोबत रणनीती तयार करत आहे. या दरम्यान मिळालेला वेळ त्याने टेनिस कोर्टवर घालवला. याआधीही धोनी अनेकदा टेनिस खेळताना दिसला आहे. क्रिकेटसोबतच त्याला फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस इत्यादी खेळांचीही आवड आहे.
महेंद्रसिंह धोनी पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझीने ४ वेळा जेतेपद पटकावले आहे. आयपीएल २०२२ मध्ये चेन्नईचा संघ गतविजेता म्हणून उतरेल. यावेळीही संघाची धुरा धोनीच्याच खांद्यावर असेल. संघाने लिलावापूर्वी धोनीसह एकूण ४ खेळाडूंना कायम ठेवले आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात खडतर स्पर्धा असल्याने चेन्नई रणनीतीनुसार ७० टक्के खेळाडू खरेदी करू शकली, तर संघ समाधानी असेल. चेन्नईच्या संघात सर्वाधिक रक्कम ही रवींद्र जडेजाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद आता जडेजाकडे सोपण्यात येणार आहे का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पण जर जडेजाला कर्णधार करण्यात आले तर धोनीची संघातील भूमिका नेमकी काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल. जर धोनी खेळणार नसेल तर तो संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतो. पण जर असं झालं तर चेन्नईच्या संघात कोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात येते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे लिलावामध्ये चेन्नईचा संघ कोणाला आपल्या ताफ्यात दाखल करतो, हे पाहावे लागेल.