मावळ : शिवसेनेचे माजी खासदार आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन बाबर यांचं निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपूर्वी बाबर यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज बाबर यांची प्राणज्योत मालवली. (Gajanan Babar Passes Away)
मावळमधे शिवसेना पक्षाविस्ताराच्या दृष्टीने गजानन बाबर यांचं प्रचंड मोठं योगदान होतं. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखादेखील बाबर यांनीच सुरू केली होती. मात्र काही वर्षांपूर्वी बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबर यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.