काही खासगी लॅबकडून वेळेत अहवाल प्राप्त होत नाहीत. अहवाल देण्यासाठी सामान्यतः एक ते दोन दिवस घेतले जातात, असंही त्यांनी सांगितलं. कदाचित खासगी लॅबमध्ये किट्स उपलब्ध नसल्यामुळं तपासणीला विलंब होतो. नमुन्यांच्या तपासणीला अधिक कालावधी लागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अचूक अहवाल देणाऱ्या खासगी लॅबमध्ये करोनासंदर्भात चाचणी करण्यास मनाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील ५ हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे सर्व जण करोनाबाधित रुग्णांच्या अतिधोक्याच्या संपर्कात आले होते. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १६२ करोनाबाधित झाले आहेत. सुदैवाने या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याचा धोका टाळता येणार आहे, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times