वाशिमः वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर काटेपुर्णा आणि पुस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे. उत्तरेला पठावरावर वसलेले चांदाई माता मंदीर तर गावाच्या पश्चिमेला शिवशक्ती मातेचे अधिष्ठान आहे. काटेपुर्णा आणि पुस या दोन नद्यांचे उगमस्थान असलेले काटा हे गाव विकसित शेती बरोबरच तीर्थ आणि पुरातन बाबींसाठी प्रसिध्द आहे. मात्र, या गावात उत्पादन घेत असलेल्या काळ्या ऊसाची सर्वत्र चर्चा आहे. काळ्या ऊसाचं उत्पादन या गावात कसं घेतलं जातं, याचा आढावा

१८ व्या शतकात मुंबईचे शिल्पकार म्हणून ख्याती असलेले जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांनी खास मॉरिशस या देशातुन काळ्या ऊसाचे वाण आणले होते. कालंतराने तेच वाण काटा या गावातील तत्कालिन शेतकऱ्यांनी मिळवुन ऊस शेती करायला सुरूवात केली. म्हणुनच या ऊसाला मॉरीशियस ऊस असे देखील म्हटले जाते.

वाचाः लातुरात पुन्हा ‘लालपरी’ धावणार; एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय

एरवी साखरेसाठी कारखान्यात व रसवंतीवर वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या ऊसाला हमीभाव मिळत नाहीत. मात्र आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेल्या काट्याच्या या काळया ऊसाला महाराष्ट्र राज्यासह शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा व गुजरात या राज्यातही मागणी आहे. आज घडीला काटा या गावांत शेकडो एकर क्षेत्रावर काळया ऊसाची लागवड होते. काटयाच्या सुपीक जमीनीत पिकणारा हा काळा ऊस येथील हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृध्दीचा प्रकाश फुलवीत आहे.

वाचाः मोदींच्या ‘या’ महत्त्वकांक्षी योजनेसाठी भाजप उतरणार रस्त्यावर; मंत्र्यांनाही घालणार घेराव

sugarcane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here