चाहते म्हणतात तू आमचा फिटनेस आयकॉन
व्यायाम केल्यामुळे पिळदार शरीराचा फोटो सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याची फक्त पाठ दिसत आहे. परंतु या फोटोमध्ये सलमानचे देखणे आणि पीळदार शरीर तर दिसत आहेच. याशिवाय त्याचे मसल्स, कट्स आणि टोन्ड बॉडी दिसत आहे. हा फोटो शेअर करत सलमानने लिहिले आहे की, ‘मी परत येत आहे…’
सलमानला मूळ रुपात परत येताना पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्याच्या या फ फोटोवर चाहते भरभरून लाईक्स आणि कॉमेन्टस करत आहेत. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. काही युजरने त्याला ‘फिटनेस आयक़ॉन’ म्हटले आहे तर काहींनी लिहिले आहे की, ‘टायगर परत आला आहे…’ तर काहींनी ‘कडक’ अशी कॉमेन्ट केली आहे.
दरम्यान, सौदी अरबमध्ये झालेल्या जॉय अॅवॉर्ड्स कार्यक्रमात सलमान खानला ‘पर्सेनॅलिटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याने पुरस्कार घेतानाचा फोटो देखील काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून शेअर केला होता.
टायगर ३ चे चित्रीकरण अंतीम टप्प्यात
काही महिन्यांपूर्वी सलमानचा ‘अंतिम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता लवकरच त्याचा टायगर ३ हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण दिल्लीत होत आहे. या सिनेमात सलमानबरोबर कतरीना कैफ दिसणार आहे.