मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका जरी बॉलिवूडची फॅशन दिवा असली तरी कधी कधी तिने घातलेल्या कापड्यांमुळे तिला ट्रोल केलं जातं. मात्र आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे, ज्यात कॅमेरामनलाच ट्रोल केलं जात आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी मलायकाला पाठिंबा देत कॅमेरामनची शाळा घेताना दिसत आहेत.

झालं असं की, करिना कपूर, मलायका अरोरा आणि अमृता खान लंचसाठी एक रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी मालायकाने काळ्या रंगाची पॅन्ट आणि बॅकलेस टॉप घातला होता. अमृता आणि करिनाही कॅजुअलं ड्रेसमध्ये दिसल्या. तिघं छायाचित्रकारांना पोझ देतात आणि गाडीमध्ये जाऊन बसतात. पण यावेळी मलायकाला एक फोटोग्राफर थांबायला सांगतो. मलायका थांबतेही आणि त्याला फोटो घेऊ देते. यानंतर ती गाडीत बसत असते तेव्हा चुकीच्या पद्धतीने तिचा व्हिडिओ काढला जातो. नेमकी हीच गोष्ट नेटकऱ्यांना आवडलेली नाही.

करिना- मलायका

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पोस्टवर अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी कॅमेरामनची चांगलीच शाळा घेतली. एका यूजरने लिहिलं, ‘बाबा कुठे कुठे झूम करतोस.’ तर दुसऱ्या एका यूजरने म्हणाला, ‘तुम्ही इतकं का झूम करता.’ आणखीन एका यूजरने लिहिलं की, ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही असं झूम करता आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करता.’ आणखीन एक यूजरने लिहिलं, ‘कॅमेरामन असं कसं झूम करू शकतो.’

नेटकऱ्यांनी फटकारले

मलायकाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहते या प्रसंगात तिला सपोर्ट करताना दिसले आहेत. मध्यंतरी मलायका आणि तिचा प्रियकर अभिनेता अर्जुन कपूर सोबत विभक्त होत असल्याच्या चर्चा होत्या. परंतु दोघांनी या खोट्या असल्याचे सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here